
तो आला… अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन. या नव्या शोचा सूत्रसंचालक आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख आहे. ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहते नव्या सीझनबद्दल खूप उत्सुक होते. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. त्याची स्टाईल ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलीच पसंतीस उतरली. टीआरपी रेटिंगवर होत असलेल्या वर्षावाने याची कबुली दिली आहे.






