Bigg Boss 17: ‘नवऱ्याला चपलेनं मारलंस आणि आता..’; विकी जैनची आई अंकितावर भडकली!

0
22
Bigg Boss 17: ‘नवऱ्याला चपलेनं मारलंस आणि आता..’; विकी जैनची आई अंकितावर भडकली!


खूप दिवसांनी आपल्या आईला आणि सासूबाईंना एकत्र पाहून विकी आणि अंकिता यांना रडू कोसळलं होतं. यावेळी अंकिताच्या आईने आपल्या लेकीला खूप पाठिंबा दिला. तर, विकीच्या खेळाचं देखील कौतुक केलं. ‘तू खूप धाडसी आहेस आणि खेळ पूर्ण करूनच घराबाहेर ये’, असे अंकिताची आई तिला म्हणाली. तर, विकी जैन याची आई देखील यावेळी खूप भावुक झाली होती. आपल्या लेकाला भेटून त्यांना खूप आनंद झाला. मात्र, सुनबाई अंकितावर त्या रागावल्या होत्या. यावेळी त्या दोघांनाही म्हणाल्या की, ‘घरात असताना तुम्ही एकमेकांशी किती छान आणि चांगलं वागत होतात. मग, इथे आल्यावर तुम्हाला काय झालं आहे?’ अंकिताला उद्देशून त्या म्हणाल्या की, ‘इथे येऊन तू नवऱ्याला चपलेने मारत आहेस?’ यावर अंकिता म्हणाली की, ‘असं काहीही नाही. मी सगळं सांभाळून घेईन.’ यावर विकीची आई तिला संतापून म्हणाली की, ‘तू काहीही सांभाळत नाहीयेस.’ या दरम्यान सासू आणि सुनेतील तूतू-मैमै पाहायला मिळाली.



Source link