Friday, October 2, 2026
Homeसातारासातारा : आईवरून शिव्या दिल्यामुळे खून; दोघा जणांना अटक | पुढारी

सातारा : आईवरून शिव्या दिल्यामुळे खून; दोघा जणांना अटक | पुढारी

[ad_1]








भुईज; पुढारी वृत्तसेवा : भुईंज येथील हमालाच्या खुनाचे गुढ उकलले असून आईवरून शिव्या दिल्यामुळे दोघांनी त्याचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले. या तपासाबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेव भालचिम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

अनिल नामदेव कुचेकर (वय 35, रा. मातंगवस्ती भुईज) याचा अज्ञातांनी दांडक्याने व दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी रोहित राजू बडवे (वय 23 वर्षे, रा. गोसावी वस्ती भुईज) व आशिष मानसिंग शिंदे (वय 29 वर्षे,रा. चिंधवली ता. वाई) यांना रविवारी अटक केली. घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत भुईंज पोलीस स्टेशन व वाई पोलीस स्टेशनची डी.बी. टीम यांनी प्रभारी अधिकारी संतोष तासगावकर व तपासी अधिकारी विशाल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना ताब्यात घेवून अटक केली. संशयितांना वाई न्यायालयात हजर केले असता दिनांक 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

याबाबतचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गजें, मेढा पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

पेट्रोल संपले अन् आरोपी सापडले

दुचाकीवरून पळून जाणारे संशयित हे पुणे येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. मात्र त्यांच्या जवळील पैसे संपल्याने ते मोबाईलवरून मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना पैशासाठी संपर्क साधत होते. याच दरम्यान तपासावर असलेल्या टीमला त्यांचे मोवाईल लोकेशन मिळाले आणि आरोपी अलगद सापडले.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments