Bigg Boss 17: अंकिता आणि विकी जैनचं लग्न मोडणार? ‘बिग बॉस १७’च्या घरात अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य!

0
43
Bigg Boss 17: अंकिता आणि विकी जैनचं लग्न मोडणार? ‘बिग बॉस १७’च्या घरात अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य!


Bigg Boss 17 Latest Update: टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन दररोज भांडताना दिसत आहेत. या शोमध्ये दोघांच्या नात्यामध्ये अनेक गोष्टी बिघडताना दिसत आहेत. अंकिता आणि विकी यांच्यात सतत वाद होत आहेत. पण, यावेळी अंकिता आपल्या पतीवर इतकी नाराज झाली आहे की, तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. पती विकी याच्यावर नाराज झालेल्या अंकिता लोखंडेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अंकिताने शोमध्ये आपल्याला आता विकीपासून दूर राहायचे आहे, असे म्हटले आहे. अभिनेत्रीच्या याच वक्तव्याने आता चांगलीच खळबळ उडाली आहे.



Source link