
Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त टीव्ही शो ‘बिग बॉस‘चा १७वा सीझन सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सीझनमध्ये आता आणखी एक ट्विस्ट येणार आहे. या खेळात सामील झालेला मुनव्वर फारुकी याला ‘बिग बॉस सीझन १७’चा एक मजबूत स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. मुनव्वर त्याच्या खेळामुळे खूप चर्चेत असतो. आतापर्यंत त्याचा प्रवास खूप सोपा होता. पण, इथून पुढे त्याच्या वाटेत आता आणखी अडचणी येणार असल्याचं दिसत आहे. लवकरच या शोमध्ये मुनव्वरच्या एक्स-गर्लफ्रेंडची वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी ‘बिग बॉस १७’मध्ये प्रवेश केला होता, त्यापैकी एक बाहेरही पडला आहे. आता समर्थ जुरेल आणि के-पॉप गायक ऑरानंतर या शोमध्ये आणखी एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या प्रवेशाची बातमी समोर येत आहे.








