
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. सध्या बिग बॉसचे १७वे पर्व सुरु असून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. हा शो दिवसेंदिवस रंगत चालला आहे. स्पर्धकांची नोकझोक, तसेच घरातून त्यांची एग्झिट या सगळ्यामुळे शो चर्चेचा विषय ठरत आहे. आता शोमधून ‘तहलका’ उर्फ युट्यूबर सनी आर्याचा घरातील प्रवास संपला आहे.







