
एका ट्विटर अकाऊंटवर बिग बॉस १७चा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सलमान स्टेजवर उभा दिसत आहे. त्याच्या दोन स्पर्धक उभे असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही स्पर्धक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये एक मुलगी बोलताना दिसत आहे की, ‘माझी अजिबात इच्छा नाही की तू माझ्या आयुष्यात पुन्हा यावे.’ त्यावर पुरुष स्पर्धक उत्तर देते की, ‘माझी स्वत:ची इच्छा नाही तुझ्या आयुष्यात पुन्हा यायची.’ ते पाहून सलमान म्हणतो, ‘अरे बापरे बाप…’ सध्या सोशल मीडियावर हा प्रीमिअरचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.








