
भालचंद्र कुलकर्णी गेले पाच दशकं मनोरंजन विश्वात सक्रिय होते. पाच दशकांच्या या बहारदार कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘पिंजरा’, ‘मुंबईचा जावई’, ‘थरथराट’, ‘खतरनाक’, ‘सोंगाड्या’, ‘नवरा नको गं बाई’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘जावयाची जात’ अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या सहाय्यक भूमिकांसाठी ते नेहमीच लक्षात राहिले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून काहीसे दूर होते.








