
Beed Murder and Suicide News In Marathi: बीडच्या गेवराई तालुक्यात धक्कादायक घडना घडली. एकसोबत लॉजवर गेलेल्या प्रेमीयुगलाचा काही तासात मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. या घटनेतील प्रेयसी लॉजवर मृतावस्थेत आढळली. तर, प्रियकर हा गावातील शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रेयसीची हत्या करत प्रियकराने स्वत:ही आत्महत्या केल्याची पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.






