Banwarilal Purohit | पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा; राजीनामापत्रात म्हटले… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
24
Banwarilal Purohit | पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा; राजीनामापत्रात म्हटले… | Navarashtra (नवराष्ट्र)


पंजाबचे राज्यपाल व चंदिगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे शनिवारी त्यांनी आपले राजीनामापत्र सादर केले. वैयक्तिक कारण आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे. 

नवी दिल्ली : पंजाबचे राज्यपाल व चंदिगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे शनिवारी त्यांनी आपले राजीनामापत्र सादर केले. वैयक्तिक कारण आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे.

पुरोहित यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. चंदिगडच्या महापौर निवडणुकीतील भाजपाlच्या विजयानंतर काही दिवसांतच ही भेट झाली होती. महापौर निवडणुकीत तिन्ही पदांवर भाजपला विजय मिळाला आहे. यात काँग्रेस-आप आघाडीला जबर धक्का मानला जात आहे. पीठासन अधिकाऱ्यांनी मतपत्रिकांशी छेडछाड केल्याचा आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.






Source link