
या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे अनेकांनी म्हटले आहे. गाण्यात एकीकडे अश्लीलता दाखवली जात आहे, तर दुसरीकडे शिवभक्त म्हणून स्वतःचे वर्णन केले जात आहे. मात्र, हे अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशारा आता बादशहाला देण्यात आला आहे. ‘सनक’ या गाण्यातून ही ओळ ताबडतोब काढून टाकावी आणि शिव भक्तांची माफी मागावी. त्यांनी तसे न केल्यास २४ तासांत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा बादशहाला देण्यात आला आहे. बादशाहने बॉलिवूड आणि पंजाबी गाण्यांमध्ये आपल्या रॅप गाण्यांनी खास ओळख निर्माण केली आहे. तथापि, बरेचदा रॅपर्स काहीतरी नवीन करण्याच्या नादात वादात अडकतात. आता बादशहा काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.






