Saturday, August 22, 2026
Homeसातारा.क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या...

.क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला असणाऱ्या कठड्याला धडकला व अडकून पडला. मोठया प्रमाणात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली

फलटण : फलटण शहरातील अतिशय वाहतूक असलेल्या चौक म्हणून नाना पाटील चौक आहे याठिकाणी पुणे सातारा बारामती पंढरपूर सांगली व आसपासच्या गावांना जोडणारा मार्ग हा नाना पाटील चौकातून जात असल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची समस्या कायम तेथे निर्माण होते आणि त्यामुळे नाना पाटील चौकामध्ये अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे .

येथील नाना पाटील चौक येथे दारूच्या नशेत कंटेनर चालकाने पाच वाहनांना धडक दिली यात एकजण जखमी झाला आहे.

याबाबात घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार व शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५ रोजी दुपारी 1 वाजण्याच्या एका कंटेनर चालक देवीप्रसाद जगदेव यादव (वय ६२ रा.लावेदा प्रतापगड उत्तर प्रदेश) यांने दारूच्या नशेत कोळकी येथे त्यांच्याकडील १८ चाकी कंटेनर गाडीने (एम एच-४९-११२०) दुचाकी, एका स्विफ्ट (एम.एच.१२.-सि.डी-९५१७) व ट्रॅक्टर ट्रॉली (एम एच ११-बी.ए-०५४४) ला धडक दिली व पुढे तो कंटेनर क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे दोन गाड्यांना धडक दिली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला असणाऱ्या कठड्याला धडकला व अडकून पडला.क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर अडकून पडल्याने मोठया प्रमाणात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. या अपघातात एक जण जखमी झाला असून सदर अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमतकुमार शहा यांनी घटनास्थळी भेट दिली. कंटेनर व कंटेनर चालकास ताब्यात घेऊन शहर पोलिसांनी  क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथील वाहतूक सुरळीत केली. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments