Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीतून सहा गॅरंटी; त्यांच्या पत्नी सुनीता...

Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीतून सहा गॅरंटी; त्यांच्या पत्नी सुनीता यांनी केले वाचन | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीतून सहा गॅरंटी; त्यांच्या पत्नी सुनीता यांनी केले वाचन

इंडिया आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी भाषण केलं. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश देखील जनतेला वाचून दाखवला.

दिल्ली – आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाली आहे. त्यांच्या अटकेची मुदतवाढ देखील झाली असल्यामुळे ते अद्याप कोठडीमध्ये आहेत. याविरुदध इंडिया आघाडी आक्रमक झाली असून २८ पक्ष दिल्लीमध्ये एकत्र आले आहेत. यावेळी झालेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी भाषण केलं. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश देखील जनतेला वाचून दाखवला.

सुनिता केजरीवाल म्हणाल्या. “केजरीवालस हे सच्चे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. ईडीने त्यांना तुरुंगात टाकलं आहे. पण, खूप काळ ते त्यांना तुरुंगात ठेवू शकणार नाहीत. ज्या हिम्मतीने आणि धैर्याने ते देशासाठी लढत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात ज्या पद्धतीने लोकांनी बलिदान दिलं, काम केलं. त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल देशासाठी काम करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सुनिता केजरीवाल यांनी यावेळी अरविंद केजरीवाल यांचा संदेश सर्वांसमोर वाचून दाखवला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments