
Arbaaz Khan Unfollows Malaika Arora: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याने नुकतीच शूरा खान हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. आता अरबाज शूरासोबत हनिमूनसाठी गेला आहे. मात्र, सध्या मीडियाचे लक्ष अरबाज खानच्या वैयक्तिक आयुष्याकडे लागले आहे. अरबाज खान याने दुसरे लग्न करून सगळ्यांनाच चकित केले होते. आता अरबाजने शूरा खानसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. मात्र, दुसऱ्या लग्नानंतर आता अरबाजच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अरबाज खानने एक्स-पत्नी मलायका अरोरा हिला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. आता त्याने मलायका अरोरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.








