Anuradha Paudwal | अनुराधा पौडवाल लढवणार लोकसभा; निवडणूक जाहीर होण्याअगोदरच केला मोठ्या पक्षात प्रवेश, वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
1
Anuradha Paudwal | अनुराधा पौडवाल लढवणार लोकसभा; निवडणूक जाहीर होण्याअगोदरच केला मोठ्या पक्षात प्रवेश, वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)


Anuradha Paudwal to contest Lok Sabha; He joined the big party before the election was announced, read in detail

Lok Sabha Election 2024 : लोकसभेची तारीख लवकरच जाहीर होणार असतानाच, तसेच आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधीच प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. त्या लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

नवी दिल्ली : लोकसभेची तारीख जाहीर होण्याला काही वेळांचा अवधी असतानाच बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज (शनिवार) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असंही कळतंय. त्या भाजपाच्या स्टार प्रचारक होऊ शकतात. अनुराधा या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी या भाषांमध्ये गायन केलंय. 1973 मध्ये ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांतील गाण्यांसोबतच त्या भजनांसाठीही विशेष ओळखल्या जातात.






Source link