
सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार ‘अंकुश’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतला दमदार अॅक्शनपट म्हणून ‘अंकुश’ या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच धडाकेबाज अॅक्शन पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकरचं लोभस दिसणंही चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुरेपूर मनोरंजनाचा आनंद देणारा ‘अंकुश’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना केवळ ६ ऑक्टोबरची वाट बघावी लागणारी आहे. या चित्रपटात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे, शशांक शेंडे, गौरव मोरे, नागेश भोसले, पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट आहे.







