
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत होता. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. चित्रपटाने जवळपास १०० कोटी रुपयांचा पल्ला पार केला. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे प्रदर्शित होणार…







