Animal Movie: रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये मराठी कलाकारांची हवा! अजय-अतुलचाही चित्रपटात हिस्सा!

0
18
Animal Movie: रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये मराठी कलाकारांची हवा! अजय-अतुलचाही चित्रपटात हिस्सा!


केववल उपेंद्र लिमयेच नव्हे, तर मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले सुद्धा या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात मृण्मयीने अगदीच छोटेसे पात्र साकारले आहे. मात्र, तरीही तिची ही भूमिका भाव खाऊन गेली आहे. मृण्मयी गोडबोले हिने ‘अॅनिमल’मध्ये एका मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला तिने चांगला न्याय दिला आहे. यासोबतच प्रेक्षकांना ‘अॅनिमल’ या चित्रपटात अजय-अतुलची झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटातील एका फायटिंग सीन दरम्यान अजय-अतुल यांचे ‘डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला’ हे गाणे ऐकायला मिळाले आहे. हिंदी चित्रपटात मराठी गाणं वाजताच प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या वर्षाव होत आहे. यामुळे मराठी कलाकारांनी ‘अॅनिमल’ गाजवला, असे सगळेच म्हणत आहेत.



Source link