Animal Collection Day 18: ‘मंडे टेस्ट’मध्येही ‘अ‍ॅनिमल’चा डंका; तिसऱ्या सोमवारी जमवला ‘इतका’ गल्ला!

0
15
Animal Collection Day 18: ‘मंडे टेस्ट’मध्येही ‘अ‍ॅनिमल’चा डंका; तिसऱ्या सोमवारी जमवला ‘इतका’ गल्ला!


Animal Box Office Collection Day 18: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. तिसऱ्या सोमवारी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने थिएटरमध्ये आता १८ दिवस पूर्ण केले आहेत. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट १ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘अ‍ॅनिमल’ला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. त्यामुळेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतके दिवस उलटले असले, तरी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत आहे. रविवारी तब्बल १३ कोटींची कमाई करणाऱ्या रणबीर कपूर-रश्मिका मंदाना स्टारर या चित्रपटाची क्रेझ आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्येही स्पष्टपणे दिसून आली आहे.



Source link