
Andre Braugher Death: नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध ‘ब्रुकलिन नाईन-नाईन’ या सीरिजमध्ये ‘कॅप्टन रे होल्ट’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते आंद्रे ब्राउगर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या टीमने या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘होमिसाईड: लाइफ ऑन द स्ट्रीट’ आणि ‘ब्रुकलिन नाईन नाईन’ या वेब सीरिजमधील भूमिकांसाठी ते खूप प्रसिद्ध होते. त्यांनी प्रतिष्ठित एमी पुरस्कार देखील पटकावला होता. सोमवारी वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आंद्रे ब्राउगर यांचे पब्लिसिस्ट जेनिफर ऍलन यांनी अभिनेत्याच्या निधनाची माहिती देताना माध्यमांना सांगितले की, आंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.







