
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसेही भरले आहेत…म्हणजे जे निळे कमळ आहे, ते आता आमच्या नावापुढे लावा भाऊ.. म्हणजे लोकांना कळेल की, आम्हीच आहोत – अमिताभ बच्चन..’ त्यांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन यांच्यासह शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, प्रकाश राज यांसारख्या अनेक स्टार्सच्या अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढण्यात आल्या होत्या. मात्र, आता बिग बींच्या अकाऊंटला पुन्हा ब्लू टिक लागली आहे.








