
लोकसभेत बोलताना अमित शहा यांनी म्हटले की, विरोधी दल मागास वर्ग-मागास वर्ग बोलत असतात. मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की,मागास वर्गाला आरक्षण देण्याचे काम काँग्रेसने कधी केले नाही, तर हे काम मोदी सरकारने केले. शहा यांनी म्हटले की, जम्मू काश्मीर विधानसभेत एक जागा पीओकेमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या लोकांसाठी राखीव करण्यात आली आहे. हा सद्य राज्याचे उपराज्यपाल नामांकित करतील.








