Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशAmit Shah On CAA | Lok Sabha Election अगोदर देशात CAA कायदा...

Amit Shah On CAA | Lok Sabha Election अगोदर देशात CAA कायदा लागू करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

Amit Shah On CAA | Lok Sabha Election अगोदर देशात CAA कायदा लागू करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Home Minister Amit Shah

Amit Shah’s statement

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीअगोदर देशात सीएए कायदा (CAA Law) लागू करणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. त्यानंतर कोणाचंही नागरिकत्व हिसकावलं जाणार नाही, असे वक्तव्य अमित शहांनी केले आहे.

Home Minister Amit Shah On CAA : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी (10 फेब्रुवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections 2024) देशात सीएए कायदा (CAA Law) लागू करणार असल्याची मोठी घोषणा अमित शहांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या भेटीदरम्यान अमित शहांनी केले होते.

ANI वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह म्हणाले, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की, CAA कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करीत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणिस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणं आहे.”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments