
Amit Shah Lok Sabha Video : आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसंच काहीसं चित्र अधिवेशनात दिसत असून बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत केलेल्या विधानामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यातल्या दोन राज्यांमध्ये तर काँग्रेसचं सरकार होतं. लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानल्या गेलेल्या या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसदेच्या हिवाळी
#WATCH | Union Home Minister Amit Shah says, “Two mistakes that happened due to the decision of (former PM) Pandit Jawaharlal Nehru due to which Kashmir had to suffer for many years. The first is to declare a ceasefire – when our army was winning, the ceasefire was imposed. If… pic.twitter.com/3TMm8fk5O1
— ANI (@ANI) December 6, 2023
नेमकं काय घडलं लोकसभेत?
लोकसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यासंदर्भात अमित शाह निवेदन करत होते. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारने तिथे कोणती विकासकामं केली? असा सवाल विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जातो. त्या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह यांनी मोदींनी केलेल्या कामांचा पाढा तर वाचून दाखवलाच, मात्र याचवेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून झालेल्या दोन चुकांमुळे काश्मीरला पुढची अनेक वर्षं अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, असा दावा अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला.
VIDEO | “I stand in the House and say responsibly that Kashmir suffered for several years because of the two blunder during the tenure of PM Jawaharlal Nehru. The biggest mistake was that when our forces were winning, cease fire was announced and PoK came into existence. Had the… pic.twitter.com/lwGy8od3YR
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2023










