America VHP Light Show in US | अमेरिकेत हिंदूंमध्ये राम मंदिराचा उत्साह, मेरीलँड एकाच वेळी 150 गाड्यांच्या दिव्यांनी उजळलं,’जय श्री राम’ च्या दिल्या घोषणा! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
America VHP Light Show in US | अमेरिकेत हिंदूंमध्ये राम मंदिराचा उत्साह, मेरीलँड एकाच वेळी 150 गाड्यांच्या दिव्यांनी उजळलं,’जय श्री राम’ च्या दिल्या घोषणा! | Navarashtra (नवराष्ट्र)


या लाइट शोमध्ये दीडशेहून अधिक गाड्या सहभागी झाल्या होत्या. वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि मेरीलँड येथील भारतीय अमेरिकन लोकांनी एकाच वेळी स्विच ऑफ करून आणि कारचे दिवे चालू करून दिव्यांचे नेत्रदीपक प्रदर्शन केले.

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाबाबत (Ram Mandir Inauguration ) संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. भारतापासून हजारो मैल दूर असलेली अमेरिकाही रामभक्तांची कमतरता नाही. नुकतचं विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेतील 10 राज्यांमध्ये श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाचे 40 मोठे होर्डिंग लावले आहेत आता विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत (VHP) लाइट शो (Light Show In US) आयोजित केला. यामध्ये लोक भगवान रामाच्या प्रतिमा असलेले झेंडे हातात घेऊन ‘जय श्री राम’, ‘राम लक्ष्मण जानकी’ आणि ‘जय श्री हनुमान की’च्या घोषणा देताना दिसले. अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने या लाइट शोचे आयोजन केले होते. यामध्ये लोक भगवान रामाच्या प्रतिमा असलेले झेंडे हातात घेऊन ‘जय श्री राम’, ‘राम लक्ष्मण जानकी’ आणि ‘जय श्री हनुमान की’च्या घोषणा देताना दिसले.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेतही राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह

अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम नगरी सजली आहे. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत देशातच नव्हे तर जगभरात उत्साह आहे. याबाबत हिंदू अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी मेरीलँडमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा देत टेस्ला म्युझिकल लाइट शोचे आयोजन केले होते. हा लाईट शो पाहण्यासारखा होता.






Source link