Allu Arjun : ‘त्या’ तक्रारीत अल्लू अर्जुनचही नाव येणार? अभिनेत्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता!

0
51
Allu Arjun : ‘त्या’ तक्रारीत अल्लू अर्जुनचही नाव येणार? अभिनेत्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता!


Allu Arjun Pushpa 2 : सध्या ‘पुष्पा २’मुळे चर्चेत असलेला अल्लू अर्जुन आता अडचणीत संपडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभिनेत्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. त्याचा बहुचर्चित ‘पुष्पा २’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’चं स्क्रिनिंग पार पडलं होतं. अल्लू अर्जुन आपल्या चाहत्यांना कसलीही कल्पना न देता सरप्राईज देण्यासाठी तिथे स्क्रिनिंगमध्ये पोहोचला होता. अशावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आणि तिथे चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.



Source link