Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रहत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ; सर्वांवर मोक्का अंतर्गत...

हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ; सर्वांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

फलटण : तावडी येथील बैलगाडा शर्यतीतील सर म्हणून ओळखले जाणारे रणजीत निंबाळकर यांची हत्या झाली  पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या ‘सुंदरा ‘ नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली

या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करून या सर्वांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र निंबाळकर यांच्या उर्वरित कुटूंबाचा भवितव्याचा विचार करून ही मदत त्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या मदतीचा धनादेश निंबाळकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्व आबासाहेब पाटील हेदेखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments