Akshay Kelkar Girlfriend Reveal : मराठी अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता अक्षय केळकर याने अखेर त्याची गर्लफ्रेंड ‘रमा’ चाहत्यांच्या समोर आणली आहे. बिग बॉसच्या घरात असताना अक्षय नेहमीच त्याच्या गर्लफ्रेंड रमाबद्दल बोलताना दिसायचा. त्यामुळे त्याला अनेक वेळा प्रश्न विचारला जात होता की, ‘अक्षय, तुझी रमा कोण आहे?’ अखेर, अक्षयने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर ‘आज मी रमाला समोर आणणार’, असं सांगितलं आणि रमा कोण हेही स्पष्ट केलं.