Akelli Review: नुसरत भरुचा ‘अकेली’च पडलीये सगळ्यांवर भारी! कसा आहे नवा चित्रपट? वाचा….

0
18
Akelli Review: नुसरत भरुचा ‘अकेली’च पडलीये सगळ्यांवर भारी! कसा आहे नवा चित्रपट? वाचा….


का बघाल?

अभिनेत्री नुसरत भरुचा हिला आपण आतापर्यंत कॉमेडी आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मात्र, ‘अकेली’मध्ये ती तिच्या या जगातून बाहेर पडून प्रेक्षकांना प्रभावित करताना दिसली आहे. तर, रफिकच्या भूमिकेत अभिनेता निशांत दहिया लक्षात राहतो. युद्धग्रस्त अज्ञात अशा या देशात ज्योती क्रूर, अमानुष आणि हिंसक घटनांमध्ये जीव वाचवण्यासाठी संघर्ष करते. या चित्रपटाची सुरुवात अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने होते. सुरुवातीलाचा एका शाळकरी मुलीला आत्मघातकी स्फोटात उडवून दिल्याचे दृश्य दिसते. हे दृश्य पाहून अक्षरशः थरकाप होतो. कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे स्क्रिप्टमध्ये रोमांच आणि उत्साह आहे. दिग्दर्शक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इराकमधील अशांत वातावरण आणि दहशतवाद्यांचा क्रूरपणा यशस्वीपणे चितारला आहे. चित्रपटात मुली आणि महिलांसोबत घडणाऱ्या अमानुष घटनांची दृश्ये दाखवून त्यांनी प्रेक्षकांना चांगलंच हादरवलं आहे. कथेतील थरार आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे. पण, त्याने कथानकावर फारसा परिणाम होत नाही.



Source link