Aditya L1 Update | ISRO नं दिली आंनदाची बातमी, आदित्य L1 मधील पेलोडनं काम करण्यास केली सुरुवात | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Aditya L1 Update | ISRO नं दिली आंनदाची बातमी, आदित्य L1 मधील पेलोडनं काम करण्यास केली सुरुवात | Navarashtra (नवराष्ट्र)


ISRO नं दिली आंनदाची बातमी, आदित्य L1 मधील पेलोडनं काम करण्यास केली सुरुवात

आदित्य सोलर मिशन (solar mission ) 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आले होते. STEPS इन्स्ट्रुमेंट 10 सप्टेंबर 2023 रोजी लाँच झाले. SWIS टूल 2 नोव्हेंबर, 2023 रोजी सक्रिय करण्यात आले आणि चांगले कार्य केले.

ISRO ने 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आदित्य-L१ अंतराळयान प्रक्षेपित केले. सूर्यमाला आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन आदित्य सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात आता इस्रोकडून मोठी अपडेट आली आहे. आदित्य-L१ च्या सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट’ हा पेलोड कार्यरत झाला आहे आणि तो सामान्यपणे कार्य करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

इस्रोच्या दिलेल्या माहितीनुसार ‘आदित्य-एल1’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा आहे. पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या Lagrangian बिंदू ‘L1’ च्या भोवतालच्या प्रभामंडलातून ते सूर्याचा अभ्यास करत आहे.





Source link