
चित्रपटातील काही वाईट संवादांमुळे लोक मनोज मुनताशीर यांना ट्रोल करत आहेत. पण, प्रेक्षकांची माफी मागण्याऐवजी मनोज मुनताशीर ‘आदिपुरुष’च्या बाजूने स्पष्टीकरण देण्यात गुंतले आहेत. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर त्यांनी एका नवीन ट्विटमध्ये लिहिले की, ‘राम कथेतून पहिला धडा शिकता येतो, तो म्हणजे प्रत्येकाच्या भावनेचा आदर करणे. बरोबर की चूक हे ठरवण्यात काळ बदलतो, मात्र भावना तीच राहते. मी ‘आदिपुरुष’मध्ये ४०००हून अधिक ओळींचे संवाद लिहिले, त्यातील ५ ओळींमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या. मात्र, उर्वरित शेकडो ओळींमध्ये, जिथे श्रीरामाचा महिमा होता, माता सीतेच्या पावित्र्याचे वर्णन होते, तिची स्तुती होती, त्या ओळींना वाहवा का नाही मिळाली हे कळत नाही.’







