Accident involving motorcycle and container on Palghar Mahim Road accident news

0
6
Accident involving motorcycle and container on Palghar Mahim Road accident news


पालघर: पालघर माहीम रोडवर असलेल्या अतिक्रमणामुळे मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात बहिण भावाच्या जागीच मृत्यू झाला. जेवण झाल्यानंतर पालघर येथे आइस्क्रीम खाऊन आपल्या मोटरसायकल वरून घराकडे परत असताना त्यांच्या मोटरसायकल ला ट्रेलरने दिलेल्या जोरदार धडकेत दोघा भावंडांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाला आहे. काल रात्री पालघर माहीम मार्गावर ताशी हॉटेलच्या जवळ मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले मंगेश विश्वकर्मा (२२)आणि पूजा विश्वकर्मा (२५) जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी दुचाकी वर घराबाहेर पडले होते. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कंटेनर ने धडक दिली. या धडकेत त्या दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भयानक होती की त्या दोन्ही भावंडाच्या शरीराचे तुकडे रस्त्यालगत इतरत्र पसरले होते.

या अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पालघर पोलिसांनी एक टीम गठित केली आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात हे करत आहेत. या प्रकरणी ट्रेलर चालका विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर माहीम रस्त्यावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत

पालघर माहीम रोडवर नगरपरिषदेच्या हळदीलगत व माहीम ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल, बार उभारण्यात आले असून या बहुतांश हॉटेल चे रस्त्यालगत अतिक्रमण झालेले आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला हॉटेलमध्ये येणारे नागरिक वाहने पार्किंग करत असल्याने रस्त्याच्या बाजूला मोकळी जागा उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत भरधाव येणाऱ्या वाहनांना या परिसरातील हॉटेल व्यवसायिकांची माहिती नसल्याने तसेच मद्यपान केलेले नागरिक योग्य पद्धतीने वाहन चालवत असल्याने अपघात व असतात. या अतिक्रमणाविरुद्ध अनेकदा तक्रारी झाल्यानंतर देखील माहीम ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली नसल्याने वीर सावरकर चौक ते वागुळसार गावापर्यंत नियमित अपघात होत असतात.

याशिवाय पालघर माहीम रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. या रस्त्यावर झालेले अतिक्रमण, सतत या भागातील उघड्यावर सोडण्यात येणारे सांडपाणी, रस्त्यावर जनावरांचा सकाळ संध्याकाळ वावर तसेच गतिरोधक नसल्याने भरधाव येणारी वाहने हे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातास कारणीभूत आहे.

या अपघातांना आळा बसण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग,माहीम ग्रामपंचायत, पालघर नगरपरिषद यासह वाहतूक विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी यांनी पालघर शहराच्या या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या होत्या. मात्र हे काम स्थानिक स्वराज्य संस्थेने करावे की सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत एकमत होत असल्याने कारवाई मध्ये दिरंगाई होत असल्याचे दिसून आले आहे.





Source link