accident in kerala | शबरीमलाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस आणि ऑटोमध्ये धडक; 5 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
accident in kerala | शबरीमलाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस आणि ऑटोमध्ये धडक; 5 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)


केरळमधील मलप्पुरममध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. मलप्पुरममध्ये झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेल्या ऑटोची थेट बसला धडक बसली, त्यामुळे हा अपघात झाला.

केरळमधून रस्ते अपघाताची मोठी (accident in kerala) बातमी समोर येत आहे. केरमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात (sabarimala temple ) दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मलप्पुरममधील मंजेरी टाऊन येथे शुक्रवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या ऑटो रिक्षाची बसला समोरासमोर धडक झाडलीमृतकांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

कसा झाला अपघात

नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान शबरीमलामध्ये मोठी यात्रा भरते. देशभरातुन भाविक मोठ्या प्रमाणावर येथे येतातत. मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या मल्लपुरममधुन काही भाविक शबरीमला मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येताना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांनी भरलेल्या ऑटोची बसला जोरदार धडक बसली. यामुळे ऑटो पलटी होऊन अपघात झाला. या अपघाता पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटली आहे. यामध्ये साबिरा, मोहम्मद निशाद, आशा फातिमा, मोहम्मद असन आणि रेहान यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांला कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे मलप्पुरम पोलिसांनी सांगितले.






Source link