
तर, आणखी एकाने लिहिले की, ‘तुला कुणाचीही नजर ना लागो.. थू थू थू… लवकर बरा हो अभिषेक!! ट्रॉफी तुझ्याच घरी येणार आहे.’ एका यूजरने लिहिले की, ‘हे ट्विट पाहून माझ्या डोळ्यात अचानक अश्रू का आले माहीत नाही. तू लवकर बारा हो.’ ‘फुकरा इन्सान’ अर्थात अभिषेक मल्हानने व्लॉगर म्हणून खूप प्रशंसा मिळवली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये जिया शंकरसोबतचा त्याचा लव्ह अँगल आणि मनीषा राणीसोबतचा क्युट बॉण्ड प्रेक्षकांना खूप आवडला. चाहत्यांनी जिया आणि मनीषासोबत अभिषेकचे अनेक व्हिडीओ केले आहेत. या चांगल्या आठवणींशिवाय त्याची ऑन-ऑफ हाणामारी आणि बाबिकासोबतची मैत्रीही चांगलीच गाजली.







