
आस्तादच्या या पोस्टवर आता चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘तसा काही पुरावा नाहीये पण सेंटिमेंट्स मात्र भरपूर आहेत.’ तर, आणखी एकाने लिहिले, ‘वाघनखे स्वतः महाराजांची असतील किंवा किमान एखाद्या मावळ्याची तरी असतील…पण ती आपली आहेत हे नक्की. प्रथम, पंचम किंवा शतम जॉर्ज, किंवा आद्य पतिव्रता लेडी माऊंटबॅटन किंवा त्याच शय्यासवयींची लेडी डायना किंवा मध्यंतरी मेलेली म्हाताराणी….यांची कोणाची तर नाहीयेत ना? ब्रिटिशांनी रायगडावरील बरीचशी कागदपत्रे जाळून नष्ट केली, अनेक वस्तू लुटून नेल्या. समतेच्या तत्त्वावर तशीच काही ब्रिटिश म्युझियम्स फोडली तर आपल्या बऱ्याच वस्तू मिळतील. पण आपले अहिंसेचे तत्त्व समतेच्या तत्त्वाआड येते.’







