
दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर आज २० एप्रिलला या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायाधिशांनी संबंधित यूट्यूब चॅनेलला आराध्याबद्दलच्या आक्षेपार्ह कंटेन्ट हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आराध्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल खोटे दावे करणारे सर्व व्हिडीओ व मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे.








