
यश, आरोही आणि अनिष हे एका म्यूझिक अल्बमसाठी एकत्र काम करत असतात. या अल्बमचे लेखन यशने केले असते, त्याचे म्यूझिक अनिशने कंपोज केलेले असते आणि गाणे आरोही गाणार असते. त्यामुळे ते तिघे सतत एकत्र दिसतात. कांचन आजी आणि ईशाला या गोष्टींपासून त्रास होताना दिसतो. पण यश आणि अनिशला काही फरक पडत नाही. ते तिघे या गाण्याच्या पोस्टरसाठी फोटोशूट करतात. त्यासाठी अनिश आणि आरोही देशमुखांच्या घरी जातात. सकाळीच आरोहीला घरत बघून कांचन आजींचा हिरमोड होतो.







