
‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काही ना काही घडतच असते. मग ती अरुंधती असो वा अनिरुद्ध. मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. नुकताच मालिकेत यश आणि आरोहीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर लगेच अभी परदेशात जाण्यास निघाला आहे. त्याला सर्वांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही थांबला नाही. आत मालिकेत नवे वळण आले आहे.







