
मात्र, तरीही वडिलांच्या विरोधात जाऊन ईशा देखील अनिशच्या प्रेमात पडली. अनिश आणि ईशाचं नातं आता अरुंधतीसमोर देखील आलं आहे. तिचा या नात्याला विरोध नसला तरी, प्रत्येक आईप्रमाणेच तिला देखील आपल्या मुलीची काळजी वाटत आहे. आधी शिक्षण पूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग पुढचा विचार करा, असा सल्ला तिने अनिश आणि ईशाला दिला. मात्र, घरून विरोध झाला तर मी पळून जाऊन लग्न करेन असा चंग ईशाने बांधला आहे.








