
एकीकडे अनिरुद्ध आणि संजना यांच्यात वाद होत आहेत. तर, दुसरीकडे आता अनिरुद्ध त्याच्या मुलांपासून देखील दुरावू लागला आहे. देशमुखांच्या घरात सध्या मेडिकल चेकअपविषयी चर्चा सुरू आहे. यावेळी अभिषेक आईला म्हणजेच अरुंधतीला चेकअपला यायचे आहे, असे बोलतो. मात्र, यावेळी अनिरुद्ध भडकतो. अरुंधतीला आता आपली गरज नाही. तिची काळजी घेण्यासाठी आशुतोष आहे, असे अनिरुद्ध म्हणतो. यावरून आता देशमुखांच्या घरात नवा वाद निर्माण होणार आहे.








