
अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नानंतर आता अरुंधती देशमुखांच्या घरातून, केळकरांच्या घरात गेली आहे. यानंतर आता देशमुखांच्या घरात मात्र, वाद सुरू होणार आहेत. एकीकडे अरुंधतीचा संसार नव्याने फुलणार आहे. तर, दुसरीकडे अरुंधतीला नेहमीच त्रास देणाऱ्या अनिरुद्धचा संसार आता पूर्णपणे मोडण्याच्या मार्गावर आला आहे. अनिरुद्ध आणि संजना यांच्या आता वाद सुरू झाले आहेत. या वादांचं कारण देखील आता अरुंधतीचं लग्नच असणार आहे.






