
ईशाच्या या वागण्यामुळे आता अनिरुद्ध आणि अरुंधतीमध्ये जोरदार वाद होणार आहेत. यावेळी ईशा आणि अनिशचं नात इथेच थांबवा, नाहीतर मी ईशाला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी कॅनडाला पाठवून देईन. हे करण्यापासून मला कुणीही थांबवू शकणार नाही, अशी धमकी अनिरुद्धने अरुंधतीला दिली आहे. आता अनिरुद्धच्या या धमकीवजा इशाऱ्यानंतर आता अरुंधती काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.






