
Maharashtra Government: रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस जारी करताच राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर फडणवीस सरकारने मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्थिगिती दिली. मात्र, शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरले आहे. भाजप हिंदूंचा केवळ मतांसाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच बांग्लादेशात हिंदू सुरक्षित नाहीत आणि महाराष्ट्रात मंदिरे सुरक्षित नाही, अशी त्यांनी सरकारवर टीका केली.