Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रफलटण येथील नीरा उजवा कालव्याच्या कार्यालयावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील...

फलटण येथील नीरा उजवा कालव्याच्या कार्यालयावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे.

अकलूज: माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे पाणी बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.रणजितसिंह मोहिते पाटील या प्रसंगी बोलताना म्हणाले की शेतकऱ्याला जात नसते पक्ष नसतो आम्ही कुठल्या तालुक्याच्या विरोधात नसून आमच्या माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी बंद करण्याचा डाव आखला जात आहे.शंकर व महर्षी कारखान्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार असल्याने सोमवार दिनांक १३ मे रोजी सकाळी ११ वाजता फलटण येथील नीरा उजवा कालव्याच्या कार्यालयावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी यात सहभागी होऊन सकाळी दहा वाजता धर्मपुरी येथून एकत्र जमून विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्व खाली आपल्या हक्काच्या पाण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन आमदार मोहिते पाटलांनी यावेळी केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments