
बारामती | बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नींबुत तेथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला आहे.
गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. रणजित निंबाळकर हे काल मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांचा वाद झाला आणि याच्यातूनच गोळीबार झाला आहे.या गोळीबार मध्ये रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत.






