Thursday, October 1, 2026
Homeसाताराप्रबुद्ध विद्याभवन या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थांना ४ वह्या , रंगपेटी , पेन,...

प्रबुद्ध विद्याभवन या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थांना ४ वह्या , रंगपेटी , पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले

फलटण : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून साहस क्रीडा मंडळ व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीचे मार्गदर्शक व आधारस्तंभ असलेले माजी उपमुख्याध्यापक विकास काकडे यांनी सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत सालाबाद प्रमाणे याही वर्षी कालकथित पी आर काकडे ( संस्थापक – साहस क्रिडा मंडळ ) व कालकथित प्रेमाताई वसंतराव काकडे यांच्या स्मरणार्थ प्रबुद्ध विद्याभवन या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थांना ४ वह्या , रंगपेटी , पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले

समाजात मोठ्या प्रमाणात विषमता, उच्च निचतेचा भेदभाव होता तो नष्ट करण्यासाठी क्रुतीशील प्रयत्न करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे होते. असे प्रतिपादन सिद्धार्थ प्रबुद्ध यांनी केले.

ते डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या प्रबुद्ध विद्याभवन मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांने समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक गरीबातील गरीब मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी शाळा व बोर्डिंग काढले. आपण सर्वांनी भरपूर अभ्यास करून शाहू महाराजांचे प्रयत्न सत्यात उतरावावे.

विकास वसंतराव काकडे ( माजी उपमुख्याध्यापक ) व उषा विकास काकडे (मुख्याध्यापिका ) च्याच्यावतीने शैक्षणिक साहित्य  योगेश पवार व सारिका पवार यांच्या हस्ते साहित्यांचे वाटप करण्यात आले . यावेळी प्रबुद्ध विद्याभवन मुख्याध्यापक व शिक्षक तसेच संघमित्रा अहिवळे व सिद्धार्थ अहिवळे या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच शिक्षकांनी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देणारे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक कारंडे व आभार गुंजवटे तर कार्यक्रमाचे नियोजन होनराव व कांबळे यांनी केले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments