Sunday, September 13, 2026
Homeसातारामहाबळेश्वरात पर्यटनाची लाट! महापर्यटन उत्सवाचा थाटामाटात समारोप

महाबळेश्वरात पर्यटनाची लाट! महापर्यटन उत्सवाचा थाटामाटात समारोप

महाबळेश्वर, धुके, गडद हिरवाई आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाबळेश्वरने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आपला ठसा उमठवला! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आयोजित ‘महापर्यटन उत्सव २०२५’ चा भव्य समारोप सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत मंत्री मकरंद पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले व आमदार सचिन पाटील आदींचा सहभाग होता.

भाजपा-महायुती सरकारने पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे पर्यटन राज्य बनवण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्वरला आधुनिक व आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

या सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुनावळे येथे शिवसागर जलाशयातील १० जेट स्की राईड्सचे लोकार्पण करण्यात आले, ज्यामुळे पाण्यावरच्या साहसी पर्यटनाला जोरदार चालना मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments