Tuesday, August 18, 2026
Homeसातारामुंबईतील बिल्डरची आत्महत्या, साताऱ्यातील दोन आमदारांमध्ये जुपली, कुटुंबीयांचाही संदर्भ दिला

मुंबईतील बिल्डरची आत्महत्या, साताऱ्यातील दोन आमदारांमध्ये जुपली, कुटुंबीयांचाही संदर्भ दिला

मुंबईतील बिल्डरची आत्महत्या, साताऱ्यातील दोन आमदारांमध्ये जुपली, कुटुंबीयांचाही संदर्भ दिला

[ad_1]

सातारा: मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर आत्महत्येप्रकरणी साताऱ्यातील दोन आमदारांमध्ये जुंपली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं म्हणत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता आरोप केले. तर सरकार त्यांचं आहे, त्यांनी खुशाल चौकशी करावी असं शशिकांत शिंदे म्हणाले. राजकारण कुटुंबापर्यंत आणाल तर आमचीही तयारी आहे. आम्ही तुमची प्रकरणं बाहेर काढली तर तुम्हाला तोंडही दाखवायला जागा राहणार नाही असं आव्हानही शशिकांत शिंदे यांनी दिलं. 

महेश शिंदेंचे आरोप काय?  

नवी मुंबई येथील ड्रग्स प्रकरणात काही महिन्यापूर्वी साताऱ्यातील बिचुकले गावातील संशयित आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाशी निगडित आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबईचे बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी रिवाल्वरने गोळी झाडून केलेल्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही हत्या असल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, “कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका बड्या नेत्याचा मुलगा 2012 मध्ये लंडनमध्ये शिकायला होता. त्याच कॉलेजमध्ये गुरुनाथ चिंचकर यांचा मोठा मुलगा नवीन चिंचकर हा देखील शिक्षणासाठी लंडनमध्ये एकत्र असल्यामुळे त्याला ड्रग्सचे व्यसन होते. या प्रकरणाच्या नैराश्यातून ही आत्महत्या झाली असावी. प्रकरणात कोणत्या नेत्याने चिंचकरांकडून दहा कोटी रुपयांची मागणी केली याची चौकशी करावी.”

राजकारण कुटुंबापर्यंत आणू नका, शशिकांत शिंदेंचा इशारा

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी ड्रग्स प्रकरणात केलेल्या आरोपांवर आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, राज्याच यांचेच सरकार आहे. त्यांनी या विषयी तक्रार करावी. या प्रकरणात कस्टम, नार्कोटेक्स विभाग चौकशी करत आहे. त्यांना जर तसेच जाणवले असते तर त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येऊन चौकशी केली असती. उगाच धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न महेश शिंदे यांनी करू नये. यांचे कोणासोबत काय व्यवसाय आहेत हे मी बाहेर काढू का?

… तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही

सातारा जिल्ह्यात आम्ही राजकारणाचे पावित्र्य राखलं आहे. ते सोडून जर तुम्ही कुटुंबापर्यंत येत असाल तर आमची तयारी आहे. आम्ही जर प्रकरण बाहेर काढली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना दिला. चिंचकर प्रकरणांमध्ये दहा कोटी मागणाऱ्या नेत्याची माहिती असेल तर त्यांनी ती तपास यंत्रणांना माहिती द्यावी. उगाच चुकीची संशयाचे बोट दाखवू नये असंही ते म्हणाले. 

माझा मुलगा कुठे शिकायला होता याविषयी महेश शिंदेंनी पुरावे द्यावेत असं आव्हान शशिकांत शिंदे यांनी दिलं. महेश शिंदे यांचा मुलगा आणि पत्नी कोल्हापूरला होते. तिथे जनावरांच्या चाऱ्याचा घोटाळा झाला. म्हणून आम्ही तसे आरोप करायचे का? आम्हाला संस्कृती आहे. राजकारण कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments