Saturday, August 22, 2026
Homeसाताराशाही आमरस थाळी आता थेट फलटणमध्ये! पुण्याला जाण्याची गरज नाही – हॉटेल...

शाही आमरस थाळी आता थेट फलटणमध्ये! पुण्याला जाण्याची गरज नाही – हॉटेल सेलिब्रेशनने दिला अनोखा स्वाद

फलटण | साहस Times
उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन, आणि आंबा म्हटलं की आमरस! पण आता पुण्यात जाऊन आमरस थाळीचा आस्वाद घेण्याची गरज नाही, कारण हॉटेल सेलिब्रेशनने फलटणमध्येच सुरू केली आहे खास शाही आमरस थाळी – तीही अनलिमिटेड!

रिंगरोडवरील रॉयल क्राऊन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या हॉटेल सेलिब्रेशनमध्ये ही थाळी दररोज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. या थाळीत हापूस आंब्याचा ताजातवाना आमरस, स्पेशल पनीर भाजी, मिक्स व्हेज, बटाटा भाजी, छोटे सामोसे, थंडगार ताक, गरम फुलके आणि हंगामातील इतर स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे.

तसेच दररोज शाही व्हेज थाळी चाही पर्याय येथे उपलब्ध आहे. तुमचा ग्रुप असेल तर विशेष बैठकीची सुविधा हॉटेलकडून करण्यात येईल.

हॉटेल सेलिब्रेशनने ही थाळी उपलब्ध करून देत पुण्याच्या चविष्ट अनुभवाला फलटणमध्येच आणले आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात आमरसाचा आनंद आपल्या शहरातच नक्की घ्या!

पत्ता:
हॉटेल सेलिब्रेशन,
पाचवा मजला, रॉयल क्राऊन, रिंगरोड, फलटण
संपर्क: 9096962854 / 9421180201

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments