Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशHathras Stampede : हाथरसचे दोषी कोण? 'भोले बाबा'च्या चरणांची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी,...

Hathras Stampede : हाथरसचे दोषी कोण? ‘भोले बाबा’च्या चरणांची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी, 121 जणांनी गमावलेला जीव

Hathras Stampede : हाथरसचे दोषी कोण? ‘भोले बाबा’च्या चरणांची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी, 121 जणांनी गमावलेला जीव

[ad_1]

Hathras Stampede Latest News : 2024 च्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशातील हाथरस इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनत अनेकांनी जीव गमावला. भक्तीच्या भावनेनं इथं जमलेल्या या सामान्यांना हे क्षण आपल्या जीवनातील अखेरचे क्षण असतील याची पुसटशीही कल्पना नव्हती. अचानकच सत्संगच्या ठिकाणी गोंधळ माजला आणि उसळलेल्या गर्दीच एकमेकांच्या पायाखाली निष्पाप जीव चिरडले गेले. 

उत्तर प्रदेशाथील हाथरस इथं झालेल्या या भीषण घटनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली असून, त्याबाबतचा अहवाल उत्तर प्रदेश विधानसभेत सादर करणअयात आला आहे. स्थानिक राज्य शासनानं स्थानप केलेल्या समितीनं यासंदर्भातील तपास पूर्ण करत एक अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करताना प्रमाणाबाहरे उसळलेली गर्दी, आयोजनाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळं हे संकट ओढावल्याचे मुद्दे अधोरेखित केले. 

समितीनं सादर केलेल्या अहवालानुसार सत्संगच्या ठिकाणहून भाविकांना बाहेर पडण्यासाठीचं कोणतंही नियोजन नसून, या कार्यक्रमाच्या मूळ आराखड्यातच कैक उणिवा दिसून आल्याचं निरीक्षणादरम्यान आढळलं. यामध्ये कट रचला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत यासाठी एसआयटी स्थापन केली जाण्याची मागणीसुद्धा केली. सदर अहवालातून समितीनं आयोजकांकडून करण्यात आलेला दावा फेटाळून लावत ही गर्दी कोणत्याही विषारी वायूमुळं उसळली  नसल्याचं स्पष्ट करत चरण राज अर्थात भोले बाबाच्या चरणांनी स्पर्शलेली धुळ घेण्यासाठीची हाक देण्याची कृती या चेंगराचेंगरीस कारणीभूत ठरल्याचं म्हटलं. 

हाथरस प्रकरणात एकूण 1680 पानांचा एक अहवाल शासनापुढे सादर करताना यामध्ये सत्संग केंद्राशी संलग्न असणाऱ्या 11 महत्त्वाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर यांच्याही नावाचा समावेश आहे. दरम्यान, भोले बाबा नामक नारायण सकार हरी यांचा मात्र या एफआयआरमध्ये किंवा 3200 पानांच्या आरोपपत्रातही उल्लेख नाही हे या अहवालातून स्पष्ट झालं. 

या सत्संग कार्यक्रमामध्ये 80000 भाविक येण्याची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात मात्र तिथं अडीच ते तीन लाखांची गर्दी झाली आणि प्रवचन संपल्यानंतर सगळी गर्दी एकाच दिशेनं निघाल्यानं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, घटनास्थळी पंखे आणि कूलिंग यंत्रणाही पुरेशा प्रमाणत नसून, पेयजल आणि तत्सम गोष्टींवरही ताण आला आणि गोष्टी बिघडत गेल्या. हे मुद्दा अहवालात नमूद करण्यात आले आहेत. 

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments